काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
सिंहगड ते उमरठ : नरवीर तानाजी पुण्ययात्रा, धारातीर्थ ते समाधी . . .
एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, एका प्रेरणादायी पराक्रमाच्या पुण्य यात्रेचं . . .
नरवीर तानाजींची "सिंहगड ते उमरठ" ही ती पुण्ययात्रा . . .
धारातीर्थ ते समाधी . . .
मग सुरू झाला पुण्य प्रवास अनेक मोहीमांचा, अनेक वर्षांचा या पुण्ययात्रेच्या शोधाचा...
एक नाही दोन नाहीत तब्बल सात वर्षांचा . . . आणि पंचवीस मोहीमांचा . . . मग आकाराला आली
नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रा . . . आणि साकारली पाहिली नरवीर तानाजी पुण्ययात्रा . .
पालखी यात्रा . . .
सिंहगड ते उमरठ....
निमित्त्य.....
नरवीरांच्या पराक्रमी हौतात्म्याचे तीनशे पन्नासावे वर्ष . . .
मैत्रेय प्रतिष्ठानच्या नेतृत्त्व आणि संयोजनाखाली एक कृतज्ञ यात्रा संपंन्न झाली . . .
सिंहगड ते उमरठ : नरवीर तानाजी पुण्ययात्रा . . .
आम्हा मैत्रेय परिवाराला सार्थ अभिमान आहे या पहिल्या पुण्य यात्रेच्या आयोजनाचा आणि त्याच्या पूर्ततेचा . . .
आणि आम्ही अत्यंत ऋणी आहोत . . .
नरवीर तान्हाजी उत्सव समिती, उमरठ यांचे
त्यांनी या पहिल्या पुण्य यात्रेची कल्पना स्वीकारली आणि साकारण्यासाठी आमच्यावर जबाबदारी सोपविली...
आम्ही ऋणी आहोत.....
जल्लोष परिवाराचे
त्यांनी आमच्या हाकेला ओ देऊन पुण्य यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला
आणि अर्थातच शिवमुद्रा प्रतिष्ठान, पोलादपूर आणि अवघी उमरठ पंचक्रोशी यांचे..
कोकणातील यात्रा संयोजनाबद्दल . . .
या यात्रेत सहभागी झालेला प्रयेक जण मैत्रेयच . . .
म्हणुनच या पुण्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक मैत्रेयाचे मनःपूर्वक अभिनंदन,
आपल्या पावलांनी इतिहासाची एक नवी प्रेरणा यात्रा सुरू झाली याचा सार्थ अभिमान बाळगा.
चला नव्या दिशा शोधुया,
प्रेरणादायी इतिहासाचा
रोमांचकारी भुगोल शोधुया
डॉ. अमर अडके
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
कांचना ते धोडप : सातमाळा डोंगररांग दुर्गमोहीम
"जल्लोष ट्रेकींग ग्रुप, नाशिक" सहयोग आयोजित "सातमाळा डोंगररांग दुर्गमोहीम"
पुष्प पाहिले
मोहीम नियोजन
पहिला दिवस
शनिवार दि. ४ जाने.
प्रातर्विधी, चहापान
सकाळी ६.०० वा सर्वांचे एकत्रीकरण व कांचना किल्ला
पायथ्याकडे प्रयाण
( सोयीनुसार नाष्टा)
किल्ला कांचना
सकाळी ७ वाजता किल्याच्या दक्षिण बाजुकडील पुर गावांतून दुर्गमोहीमेला सुरुवात.
सकाळी ११.३० पर्यंत कांचनामोहीम
सकाळी ११.३० नंतर डोंगरधारेने धोडप किल्याकडे प्रस्थान.
दु.२.०० वाजेपर्यंत धोडप चढाई ..
दु.२. ते ३.००माचीवर जेवण
नंतर धोडप किल्ला दर्शन व भटकंती.
चर्चा, परिचय, संवाद
रात्रीचे भोजन.गुहेत अथवा योग्य ठीकाणी मुक्काम.
दुसरा दिवस
रवि. दि. ५ जाने. प्रातर्विधी, नाश्ता करून
सकाळी ६.३० वाजता डोंगर धारेने किल्ले रवळा -जवळा कडे प्रयाण
८.३० वाजेपर्यंत जवळा किल्यावर चढाई.
सकाळी ११.३० वा. पर्यंत दुर्गदर्शन
स. ११.३० परदेशवाडीकडे उतराई.
२.०० वा. पर्यंत रवळा किल्यावर चढाई, भोजन, दुर्गदर्शन, विश्रांती.
दु.२.३० पर्यंत परतीला सुरूवात
दु. ४.०० पर्यंत बाबापूर खिंडीत पोहचणे.
नाशिककडे परतीला.
सदरचे वेळापत्रक सामान्य परिस्थितीस अनुसरून आहे. प्रत्यक्ष मार्गक्रमणा, निसर्ग, दुर्गदर्शन कालावधी, भोजन विश्रांती यांच्या सापेक्षतेने वेळेत व नियोजनात बदल होऊ शकतो.
पूर्व तयारी, काटेकोर नियोजन यांच्या सूचना सातत्त्याने दिल्या जातील.
संपर्क
श्री. राजेश पाटील,
कार्यवाह, मैत्रेय प्रतिष्ठान
मो. ९८५०४२४४१७
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
सेलबारी-डोलबारी डोंगररांग : साल्हेर ते मुल्हेर मोहीम
चला नव्या दिशा शोधुया,
प्रेरणादायी इतिहासाचा
रोमांचकारी भुगोल शोधुया
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
गोरख गड ते सिद्ध गड
चला नव्या दिशा शोधुया,
प्रेरणादायी इतिहासाचा
रोमांचकारी भुगोल शोधुया
काही वैशिष्ठ्यपूर्ण मोहिमा
पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा : साहसी रात्र मोहीम २०१९
पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा : साहसी रात्र मोहीम २०१९
महाराष्ट्रातील आद्य एक दिवसीय आणि साहसी रात्र मोहीम
पन्हाळगड ते पावनखिंड ही मैत्रेयची वैशिष्ठ्यपूर्ण साहसी रात्र मोहिम.
डॉ. अमर अडके यांच्या मोहीमेचे हे ३७वे वर्ष... शेकडो इच्छुकांमधून आपणास या इतिहास आणि भूगोलाच्या वास्तव आणि ज्वलंत अनुभूतीच्या मोहीमेत सहभागी होण्याची संधि मिळाली यासाठी आपले अभिनंदन आणि बहुसंख्येने पूर्ण केल्याबद्दल मनस्वी अभिनंदन. आपला अमाप उत्साह आणि जिद्द याला मैत्रेयचा मानाचा मुजरा.
मैत्रेयच्या गडकोट चळवळीचा मानबिंदू असणाऱ्या या आद्य रात्र मोहिमेची इतिहास आणि भूगोलासह आपण ज्वलंत अनुभूती घेतलीत.
हा शिवचरित्रातील रोमांचकारी पर्वाचा आयुष्यभराचा ठेवाच जणु
चंद्रपूरापासून ते चिपळुणपर्यंत
नाशिकपासून ते सांगलीपर्यंत
परभणीपासून ते पुण्यापर्यंत
आणि बेळगाव, कऱ्हाड अशा सर्वदूर महाराष्ट्राची एक साहसी धारातीर्थ यात्रा असेच मोहीमेचे स्वरूप होते. म्हणूनच कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातुन आलेल्या सर्व साहसवीरांना मानाचा मुजरा.
व्हाईट आर्मीचे जवान आणि ऍस्टर आधार रुग्णालयाचे वैद्यकीय पथक यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.
संपूर्ण मोहिमेच्या दिमाखदार यशस्वीतेचे सर्व श्रेय मैत्रेयच्या कार्यवाहांसह, संचालक, संघनायकांचे अमाप कष्ट यालाच आहे हे निर्विवाद.
मैत्रेय अशा संघनायकांचा अभिमान बाळगते. हीच मैत्रेयची खरी उर्जा आहे . महाराष्ट्रातील सर्वात प्रदीर्घ परंपरेच्या, लष्करी शिस्तीच्या आणि इतिहास आणि त्याच्या भूगोलाच्या अस्सल अनुभूतीच्या मोहीमेत सहभागी झाल्याचा अभिमान बाळगा.
आणि सज्ज व्हा मैत्रेयच्या आगामी चाकोरीबाहेरच्या नव्या दुर्गमोहीमेला. तपशील लवकरच आपल्या भेटीला. तोपर्यंत अभिनंदन
डॉ. अमर अडके