मोबाईल : 9890663604, 9421386013
ई-मेल : dramaradake@rediffmail.com
निवास :
“शिवेश्वरी”, ‘हरीओमनगर’, प्ऌॉट नं. 258/259, लेन नं. 17 बी, रंकाळा (पश्चिम बाजू), 'ए' वॉर्ड, कोल्ह्रापूर-416010
दुरध्वनी : 0231 - 2324920
रूग्णालय :
“आरोग्यशाला”, आर्युवेदिक रूग्णालय व क्षारसूञ क्लिनीक, १२४३्/८५-८७, 'ई' वॉर्ड, शिवाजी उद्यमनगऱ, कोल्हापूर-४१६००८
दुरध्वनी : 0231 - 2663604
सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर मेडीकल असोसिएशऩ, निमा़ आयुर्वेद व्यासपीठ आदी विविध वैदयकीय संघटनांमध्ये तसेच मैत्रेय प्रतिष्ठाऩ, सहयाद्री प्रतिष्ठान अशा गडकोट इतिहास यांना वाहीलेल्या संस्था, जायंटस् इंटरनॅशनल यासारख्या स्वयंसेवी संस्थामध्ये संचालक, पदाधिकारी, विश्वस्त, संस्थापक आदीं प्रकारे कार्यरत.
ध्येय
शिवछत्रपतींनी ज्या गडकोट आणि सहयाद्री, तेथील गिरीशिखरे, अरण्ये, घाटवाटा यांच्या साथीने स्वराज्य उभारले त्यांचे समग्र दर्शन व समग्र अभ्यास.
|| जय शिवराय ||
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आदि राज्यातून गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती. विशेषतः छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत योगदान असलेले दुर्ग आणि स्थळे यांची पायी भटकंती. १९८३ सालापासून गेली अखंड ३६ वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. या कालावधीत आज अखेर सुमारे ४५४ किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती पूर्ण केली आहे. त्याचे संपूर्ण संकलन केलेले आहे.
विशेष उपक्रम
दुर्गस्थापत्याचा
आदी अंगानी समग्रा अभ्यास करुन तपशीलवार संकलन केलेले आहे. त्या आधारे अनेक दुर्गांवर “दुर्गसंवर्धन उपक्रमांमध्ये” सातत्यपूर्ण सहभाग.
ताडोबा, पेंच, नवेगाव बांध, कान्हा, कोयना, चांदोली, दाजीपूऱ, दांडेली, बंदीपूऱ, मदुमलाई, कुद्रेमुख, पेरियार आदि वन्यजीव अभयारण्ये, सहयाद्रिमधील निबीड जंगले, दुर्गम कडे यांची अभ्यासपूर्ण भटकंती.
(वन्यजीव आणि वनस्पती यांचा अभ्यास)
प्रबोधनपर विशेष उपक्रम
गडकोट, अरण्ये, डोंगरशिखरे व डोंगरकडे, किनारे, घाटवाटा यांच्या भटकंती दरम्यान निर्सगाची विलोभनीय रूपे अनुभवता आली. तसेच निर्सगाच्या रौद्रतेची अनुभूती आली. काही ध्येयवेडी उत्तुंग माणसे भेटली. गडकिल्ल्यांच्या अपरिचित अंगांचा विस्मयकारक परिचय झाला. हे सारे शक्य तितके कॅमेराबध्द करण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता आजअखेर जवळ जवळ 13,000 छायाचित्रांचा प्रचंड संग्रह तयार झाला.
महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व्यासपीठे, नामवंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला, शारदीय व्याख्यानमाला, नगरपालिका, महानगरपालिका, सांस्कृतिक महोत्सव, नामवंत शाळा, महाविदयालये‚ शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था तसेच शिवजयंती, शिवपुण्यतिथी, राज्याभिषेक दिन आदि पवित्र दिवसांच्या कार्यक्रम प्रसंगी गडकोट, निसर्ग, अरण्यअनुभव यावर रसिकप्रिय व्याख्याने.
प्रबोधनपर विशेष उपक्रम
प्रतिवर्षी 12 एकदिवसीय आणि 12 निवासी अशा 24 दुर्ग मोहीमांचे आयोजन,
विशेषत: पन्हाळगड ते विशाळगड ही शिवचरित्रातील ओजस्वी पर्व असणारी खडतर आणि रोमांचकारी मोहीम 1983 सालापासून गेली अखंड 37 वर्षे सातत्याने सुरू आहे. आजपर्यंत हजारो तरूणांना त्या मार्गावरून नेले आहे. गडकोटांचे रोमांचकारी दर्शन तरूणपिढीला व्हावे आणि स्फूर्ती मिळावी तसेच गडकोटांचे संवर्धन व्हावे या हेतूने गडकोट दर्शन मोहीमांचे आयोजन. उदा. पन्हाळगड दर्शऩ, रायगड दर्शऩ, राजगड दर्शऩ, तोरणा, सिंहगड दर्शऩ, विशाळगड दर्शऩ, सिंधुदुर्ग दर्शऩ, विजयदुर्ग दर्शन इ. शिवचरित्रातील लोकोत्तर युध्दमोहीमांच्या रणभूमींचे दर्शन उदा. पन्हाळगड ते विशाळगड, उबंरखिंड नेसरीचे युध्द़, वाई ते प्रतापगड, राजगड ते प्रतापगड इ. रोमांचकारी मोहीमा. तसेच राजगड ते रायगड, रांगणा ते मनोहर मनसंतोष गड, भुदरगड ते रांगणा, सिंहगड ते राजगड, राजगड ते तोरणा, प्रतापगड ते रायगड, पारगड ते हनुमंतगड, प्रचितगड आदी खडतर मोहीमा.
शिव छत्रपतींनी ज्या गडकोटांवरून हे स्वराज्य निर्माण केले़ हे गडकोट म्हणजे धारातीर्थे आहेत, स्फुर्तीस्थळे आहेत‚ शिवरायांचे हे गडकोट वेगळया माध्यमातून लोकांना दाखवावेत, त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी या ध्येयपूर्ण हेतूने हे गडकोट, त्यांची रचना, स्थाऩ, स्थापत्याची वैशिष्ठये, रोमांचकारी इतिहास, स्वराज्य स्थापनेच्या संघर्षात आखलेल्या पराक्रमी मोहीमा या सर्वांचा समावेश करून स्फूर्तीदायी‚ माहीतीपूर्ण, प्रबोधनपर कार्यक्रम, ध्वनीचित्र स्लाईड-शोच्या माध्यमातून तयार केले. असे कार्यक्रम् महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अनेक ठिकाणी अमाप प्रतिसादात सादर केले. आजपर्यंत कोल्हापूऱ, इचलकरंजी, निपाणी, रोहा, अहमदनगऱ, राहूरी, जळगाव, विजयदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, पुणे, बेळगाव, खानापूऱ, पन्हाळा, सातारा, सांगली आदि अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत़ मान्यवर संस्थांच्यावतीने सादर केले आहेत.
प्रबोधनपर विशेष उपक्रम
गेली 37 वर्षे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील गडकोटांची भटकंती सुरू आहे. ‘चारशेचोपन्न’ किल्ले आजपर्यंत पायी फिरून अभ्यासले आहेत. हे किल्ले़ त्यांची रचना़वैशिष्ठये़ इतिहास़ आसमंत यांसह छायाचित्रित केले आहेत. अशी दुर्मिळ तेराहजार छायाचित्रे आजपर्यंत काढली आहेत. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झालेले हे हे गडकोट म्हणजे आपली स्फूर्तीस्थळे आहेत. त्यांचे दर्शन आबालवृध्दांना व्हावे़ त्यांच्यात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी या हेतूने यातील निवडक छायाचित्रांचे एक भव्य प्रदर्शन तयार केले. हे वैशिष्ठयपूर्ण प्रदर्शन अनेक ठिकाणी सादर केले. सर्वच ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन कोल्हापूऱ, कागल, निपाणी, बेळगांव, सावंतवाडी, इचलकरंजी, गारगोटी, जळगांव, राहुरी, रोहा, पुणे, सातारा, अहमदनगर तसेच विजयदुर्ग महोत्सव, शिवदुर्ग पन्हाळा महोत्सव, कणकवली पर्यटन महोत्सव आदी अनेक ठिकाणी सादर केले आहे. या माहीतीपूर्ण प्रदर्शनास आजपर्यंत राजकीय नेते, मंत्री तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे सातारा, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत युवराज संभाजीराजे आदि शिवरायांच्या राजवंशजांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत तसेच अभिनेता नाना पाटेकऱ, गायक अरूण दाते अशा अनेक मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन कौतुक केले आहे.
गडकोटांचे सवंर्धन व्हावे, महाराष्टाची ही धारातीर्थे जगाच्या पर्यटन नकाशावर यावीत या या हेतूने आयोजित अनेक दुर्गमहोत्सवांचे आयोजन व सहभाग. उदा. विजयदुर्ग अष्टशताब्दी महोत्सव, पन्हाळा शिवदुर्ग महोत्सव, सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव इ. दुर्गस्थापत्त्य कार्यशाळा‚ पन्हाळगड
इतर
मैत्रेय प्रतिष्ठान च्या सिंहगड ते उमरठ, नरवीर तानाजी पुण्ययात्रा हा ऐतिहासिक सोहळा यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल डॉ. अमर अडके सर यांची रेडिओ सिटी 95 FM वर लाईव्ह मुलाखत दि. 19/02/20202 रोजी संध्याकाळी 7ते 8 या वेळेत R J मिलिंद सोबत
रग रग में राजे
रग रग में कोल्हापूर सिटी
'शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व तत्व प्रणालींचा व प्रेरणांचा आपल्या व्यवहारात वापर करणे व त्यातून व्यक्ती ची उन्नती करणे, समूहाची उन्नती करणे आणि पुढे राष्ट्राची उन्नती करणे हा शिवजयंती साजरा करण्यामागचा मूळ हेतू असतो.'
- डॉ. अमर आडके दुर्गअभ्यासक आणि अध्यक्ष, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर. #SVERI