Maitrey-Pratisthan-white

सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

सिंहगड ते उमरठ

नरवीर तानाजी पुण्ययात्रा : धारातीर्थ ते समाधी

सिंहगड ते उमरठ
सिंहगड ते उमरठ
सिंहगड ते उमरठ

पुण्ययात्रा

नरवीर तानाजी धारातीर्थी पडले या पराक्रमाला यावर्षी साडेतीनशे वर्षे होत आहेत. त्यांचा पुण्यदेह सिंहगडावरून उमरठ येथे सह्याद्रितील खडतर वाटेने आणला. त्याच खडतर वाटेने नरवीर तानाजी पुण्य यात्रेचे आयोजन मैत्रेय प्रतिष्ठानचे वतीने डॉ. अमर अडके यांचे मार्गदर्शनाखाली दि.१४ पासून केले जाणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या या पुण्य यात्रेमध्ये सहभागी होऊन नरवीरांना वंदन करूया.

या मोहीमेमधील दोन टप्पे खडतर असून पुर्वानुभव आणि मानसिक शारीरिक क्षमतेच्या निकषावरच प्रवेश दिला जाणार आहे.

पुण्ययात्रा नियोजन

  • शुकवार दि. १४ फेब्रु.२० : रात्री सर्व ठीकाणांहून सिंहगडाकडे प्रस्थान
  • शनिवार दि.१५ फेब्रु.२० : महाराष्ट्रातील सर्व ठीकाणांहून मोहीमवीर सिंहगडावर जमतील
  • पहाटे ५.०० वा. : धारातीर्थपूजन पालखी, स्थळ -नरवीर स्मारक
  • पहाटे ५.३० वा. : नरवीर पुण्ययात्रा पालखी प्रस्थान
  • पुण्य यात्रा टप्पा क्र.१ : सिंहगड ते राजगड पायथा
  • पुण्य यात्रा टप्पा क्र.२ : राजगड पायथा ते केळद, केळद येथे पालखी विसावा
  • पुण्य यात्रा टप्पा क्रं.३ : केळद ते रानवडी
  • पुण्य यात्रा टप्पा क्रं.४ : कोकणातील मार्गक्रमण
  • रात्री पालखी विसावा
  • रविवार दि. १६ फेब्रु. २०
  • पुण्य यात्रा टप्पा क्रं.५ : मूळ मार्ग आणि मालुसरे, शेलार परिवाराच्या वाड्या- गावांमधून पालखी मार्गक्रमण, रात्री पालखी विसावा
  • सोमवार १७ फेब्रु.२०
  • टप्पा क्रं.६ : विसावा ते उमरठ, उमरठ येथे नरवीर वंदन

यातील खडतर टप्पे सिंहगड ते राजगड पायथा आणि केळद कडा ते रानवडी असून या मुख्य मोहीमेमध्ये निवडक मोहीमवीर असणार आहेत. मोहीमेच्या खडतर मार्गक्रमणाची सांगता येथे होईल. ऊर्वरीत म्हणजे रानवडी ते उमरठ या पुण्ययात्रेच्या कोकणातील मार्गक्रमणात कोणीही सहभागी होऊ शकते. मैत्रेय प्रतिष्ठानचे मोहीम वीर रानवडी येथे पालखी कोकणातील आयोजक संस्थाकडे सुपुर्द करेल. पुढे या पालखीचे संयोजन नरवीर तानाजी उत्सव समिती, शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि अनेक संस्था करणार आहेत.

आपले नम्र

मैत्रेय प्रतिष्ठान

मोहीम संयोजन विभाग

मुख्य खडतर मोहीमेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक

गुरूवार दि. १३ फेब्रु .२०

मोहिमेनंतर

एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, एका प्रेरणादायी पराक्रमाच्या पुण्य यात्रेचं . . .

नरवीर तानाजींची "सिंहगड ते उमरठ" ही ती पुण्ययात्रा . . .

धारातीर्थ ते समाधी . . .

मग सुरू झाला पुण्य प्रवास अनेक मोहीमांचा, अनेक वर्षांचा या पुण्ययात्रेच्या शोधाचा,,,

एक नाही दोन नाहीत तब्बल सात वर्षांचा . . . आणि पंचवीस मोहीमांचा . . . मग आकाराला आली

नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रा . . . आणि साकारली पाहिली नरवीर तानाजी पुण्ययात्रा . .

पालखी यात्रा . . .


सिंहगड ते उमरठ....

निमित्त्य.....

नरवीरांच्या पराक्रमी हौतात्म्याचे तीनशे पन्नासावे वर्ष . . .

मैत्रेय प्रतिष्ठानच्या नेतृत्त्व आणि संयोजनाखाली एक कृतज्ञ यात्रा संपंन्न झाली . . .

सिंहगड ते उमरठ : नरवीर तानाजी पुण्ययात्रा . . .

आम्हा मैत्रेय परिवाराला सार्थ अभिमान आहे या पहिल्या पुण्य यात्रेच्या आयोजनाचा आणि त्याच्या पूर्ततेचा . . .

आणि आम्ही अत्यंत ऋणी आहोत . . .

नरवीर तान्हाजी उत्सव समिती, उमरठ यांचे

त्यांनी या पहिल्या पुण्य यात्रेची कल्पना स्वीकारली आणि साकारण्यासाठी आमच्यावर जबाबदारी सोपविली...

आम्ही ऋणी आहोत.....

जल्लोष परिवाराचे

त्यांनी आमच्या हाकेला ओ देऊन पुण्य यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला

आणि अर्थातच शिवमुद्रा प्रतिष्ठान, पोलादपूर आणि अवघी उमरठ पंचक्रोशी यांचे..

कोकणातील यात्रा संयोजनाबद्दल . . .

या यात्रेत सहभागी झालेला प्रयेक जण मैत्रेयच . . .

म्हणुनच या पुण्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक मैत्रेयाचे मनःपूर्वक अभिनंदन,

आपल्या पावलांनी इतिहासाची एक नवी प्रेरणा यात्रा सुरू झाली याचा सार्थ अभिमान बाळगा.

चला नव्या दिशा शोधुया,

प्रेरणादायी इतिहासाचा

रोमांचकारी भुगोल शोधुया


डॉ. अमर अडके

सह्याद्रीच्या गिरिशिखरांवरून : अनुभूतीचे शब्दांकन

गडकोटांचे अंतरंग शोधणारा माणूस : डॉ. अमर अडकेंची भ्रमंती आता पुस्तक रूपात

गडकोटांची भ्रमंती करून त्यांचा इतिहास, सौंदर्य, वैभव लोकांपर्यंत पोहोचवणारे डॉ. अमर अडके यांनी आजवर ४५४ किल्ले सर केले. किल्ल्यांच्या बाह्य रुपासह त्यांच्या अंतरंगातही डोकावणारे डॉ. अडके हे चिकित्सक अभ्यासकही आहेत. गेल्या ४० वर्षात केलेल्या भ्रमंतीचे वर्तमान आणि त्यामागील इतिहास पुस्तक रूपाने उपलब्ध झाला आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील अप्रकाशित इतिहास आणि शिवकाल लोकांसमोर येत आहे. इतिहास प्रेमींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

शोध घाटवाटांचा

धुऱ्याची वाडी / हणमंते : अरण्य - घाटमाथा मोहीम

धुऱ्याची वाडी - हणमंते
धुऱ्याची वाडी - हणमंते
धुऱ्याची वाडी - हणमंते

महत्त्वाचे

  • पूर्ण पोषाख आवश्यक : ( पुरुष-फुलपँट, लांब बाह्यांचा टीशर्ट/ अथवा शर्ट. स्त्रियांना सलवार-कुर्ता सुद्धा चालेल)
  • चांगले ट्रेकींग शूज, शक्यतो राऊंड कॅप, चांगली काठी
  • प्रत्येकी किमान दोन लिटर पाणी सतत बरोबर आवश्यक
  • मोहीमेमध्ये चाल, पुर्वानुभव, सहभागींची वेगवेगळी क्षमता यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल होऊ शकतो म्हणून पुरेसे खाणे भरपूर आणि पाणी आपल्या जवळ असणे आवश्यक
  • स्वतःस आवश्यक औषधे बरोबर ठेवणे
  • संघनायकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि मोहीम प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल.
  • अरण्यामध्ये परस्परांशी मोठमोठयांने गप्पा मारणे निषिध्द
  • वसंत आणि ग्रीष्मातले हे उन्ह कोरडे आणि टोकदार असते तेव्हा ऊन्हापासून बचावासाठी पोषाख रचना असावी.


वाहन क्रमांक व नावे

१) चिकेवाडी

२) तांब्याची वाडी

३) दुकानवाड


नियोजन : रविवार दि.२८ एप्रित

  • पहाटे ५.३० वाजता प्रस्थान
  • नियोजित थांबे

१) गंगावेश

( वाहन क्रं.१- चिकेवाडी)

२) डॉ.अमर अडके, निवासस्थान

( वाहन क्रं.२- तांब्याची वाडी)

३) हॉकी स्टेडीयम

(वाहन क्र.३ - दुकानवाड)

  • सकाळी आठ वाजता पाटगांव श्री मौनी महाराज मठ
  • आगमन
  • सकाळी ८.०० ते ९.००
  • अल्पोपहार, प्राथमिक माहिती
  • सकाळी ९.०० मोहीम सुरू
  • दुपारी. १२.३०पर्यंत अरण्ययात्रा व हणमंत्ये येथे आगमन
  • दु. १२.३० ते १.३० भोजन .विश्रांती
  • दुपारी १.३० ते २.३० परस्पर परिचय, मनोगते, सांगता
  • वेळ, सोयीनुसार हणमंत्या परिसर भटकंती


दु. ४.०० नंतर कोल्हापूरकडे प्रयाण.

मोहिमेनंतर

डोंगर -अरण्य यात्रा, घाट वाट मोहीमपर्व अंतर्गत "हणमंते घाट, अरण्ययात्रा" या मोहीमेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आणि वेगळा अरण्यानुभव घेतलेल्या सर्व मैत्रेयांचे मनःपूर्वक अभिनंदन.

आपण दिलेल्या ऊत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार.

इतिहासाच्या भूगोलाची आणि सह्याद्रिच्या अंतरगाची वेगळीच अनुभूती चाकोरीबाहेरच्या अशा वैशिष्ठ्यपूर्ण मोहीमांद्वारे आम्ही आपणास सातत्त्याने देतो आहोत.

हिरवेगार डोंगर आणि पठारे सौंदर्यशाली असतातच पण वसंत आणि ग्रीष्मातली सोनेरी पिवळ्या पार्श्वभूमीवरची बहुविध पुष्पांनी सजलेली आणि रानमेव्याने बहरलेली अरण्ये अधिकच लोभसवाणी असतात. त्याची अनुभूती आपण काल घेतलीच.

वसंत ग्रीष्मातल़्या अशा अरण्याचे सौंदर्यशाली अंतरंग अनुभवण्यासाठी आडवाटेवरची अशीच एक आगामी मोहीम आपण आखत आहोत त्याचा तपशील लवकरच आपल्याला सादर होईल. तेंव्हा सज्ज व्हा सह्याद्रिच्या अंतरंगातल्या एका नव्या मोहीमेला

आपले नम्र

मैत्रेय प्रतिष्ठान

मोहीम संयोजन विभाग

शोध घाटवाटांचा

ऐनारी गुहा - पायरी घाट - गगनगड

ऐनारी गुहा
ऐनारी गुहा
ऐनारी गुहा

मोहीम

रविवार दि. १७ मार्च २०१९

नियोजन

  • पहाटे ५.३० वा. : एकत्र येणे आणि गगनबावडा प्रस्थान,
  • सकाळी ७.०० वा : गगनबावडा आगमन
  • सकाळी ७.०० ते ८.०० : अल्पोपहार -चहा
  • सकाळी ८.४५ : भुईबावडा घाट मार्गे ऐनारी आगमन
  • सकाळी ९.०० ते १०.३० : ऐनारी गुहेपर्यंत डोंगर-अरण्य मोहीम
  • सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० ऐनारी परत
  • दुपारी १२.३० ते १.१५ : गगनबावडा परत
  • दुपारी १.१५ ते २.१५ : जेवण विश्रांती
  • दुपारी २.१५ ते ३.०० : पायरी घाट (घसारा, झाडी, वहिवाटीचा अंदाज घेऊन)
  • दुपारी ३.१५ते ४.४५ : अपरिचित गगनगड दर्शन
  • सायं.५. ०० परतीचा प्रवास : वेळ, दुर्गमता, क्षमता यांच्या अपरिहार्यतेनुसार नियोजनात आवश्यक ते बदल ऐनवेळी केले जाऊ शकतात.
  • कृपया, प्रवेश संख्येवर मर्यादा असल्याने आपला सहभाग त्वरीत निश्चित करा
  • आग्रही विनंतीनुसार सहभागाची वाढीव अंतिम तारीख गुरुवार दि. १४ मार्च आहे

मोहीमेसाठी आवश्यक तयारीचा तपशील लवकरच आपल्याला सादर.

आपले नम्र

मैत्रेय प्रतिष्ठान

मोहीम संयोजन विभाग

सह्याद्रिच्या अंतरंगात अनेक विलोभनीय स्थापत्त्य शिल्पे दडलेली आहेत. दुर्गांची ,घाटवाटांची, गुहांची ही अपरिचित शिल्पे शतकानुशतकांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. अशा, आडवाटेवरच्या सह्याद्रिमधली भटकंती हे मैत्रेयचे वैशिष्ठ्य !


अगदी आपल्या जवळच्या सह्यगिरिच्या दऱ्या अरण्यातील वेगळे सौंदर्य अनुभवण्यासाठी आयोजित करत आहोत.एक चाकोरीबाहेरची


आपले नम्र

मैत्रेय प्रतिष्ठान

मोहीम संयोजन विभाग

मैत्रेय प्रतिष्ठानचे सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

Scroll to Top