Maitrey-Pratisthan-white

सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

वैशिष्ट्यपूर्ण रात्र मोहीमा

' पन्हाळा ते पावनखिंड’ मोहीम

महाराष्ट्रातील पहिल्या एकदिवसीय आणि अखंड रात्र पावनखिंड मोहीमेची सुरुवात ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ ने केली. या मोहीमेचे जनकत्व मैत्रेय प्रतिष्ठानकडे जाते. म्हणूनच ‘महाराष्ट्रातील आद्य एक दिवसीय आणि अखंड रात्र मोहीम’ हे बिरुद आम्ही सन्मानाने आणि अभिमानाने मिरवतो… त्याचा हा मागोवा. सन १९८३ साली आमची पहिली ‘पन्हाळा ते पावनखिंड’ मोहीम. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सहकारी बरोबर. मार्गाची दुर्गमता, अननुभव यामुळे वाटेत आंबेवाडी येथे मुक्काम त्यामुळे दुसर्‍या दिवशी पावनखिंडीत पोहोचलो मग हाच प्रघात पडला. दरम्यान प्रतिवर्षी जसजसा अनुभव येत गेला त्या आधारे काही वर्षांनी महाराष्ट्रातील पहिली एक दिवसीय मोहीम सुरु केली. ही आद्य एकदिवसीय मोहीम होय.एक दिवसीय मोहीमेच्या अनुभवावर मग रात्र मोहीमेचे प्रयत्न सुरु. आणि मग साकारले महाराष्ट्रातील पहिल्या ‘साहसी रात्र मोहीमेचे ’आयोजन. हीच महाराष्ट्रातील ‘आद्य रात्र मोहीम’ होय. मग खर्‍या अर्थाने इतिहास अनुभुतीसाठी रात्र मोहीम विकसित आणि सातत्यपूर्ण आयोजन. गेली तब्बल ३७ वर्षे सुरुवातीला दोन दिवसीय, मग एकदिवसीय आणि मग रात्र मोहीम असा पावनखिंडीचा प्रवास व्रतस्थपणे अप्रतिहत करत आहोत.


मोहीमेचे नियोजन आणि तयारीचा तपशील लवकरच सादर.


संपर्क : राजेश पाटील, कार्यवाह

' कात्रज-सिंहगड' मोहीम

दि. 19/02/2022 व 20/02/2022

शिवजयंतीचे औचित्यं साधून मैत्रेय प्रतिष्ठानकडून आयोजित केलेला कात्रज-सिंहगड ट्रेक प्रथमदर्शनी जोतिबा ४/५वेळा चालणे ईतकच वाटलेले..!


पण जेंव्हा कात्रज वरुन त्या १३ डोंगररांगांची कल्पना केली मी तर पारच अवसान गाळून बसले ! पण डॉ. अडके सरांच्या बोलण्याने गमावलेला आत्मविश्वास परत आला.. पुढे चालत जाईल तसे मनातून शिवरायांचा घोष सुरु ठेवत चालत राहीले!


आता मला ते स्वप्नवत वाटतेय... कारण किलोमीटर कमी हो पण ईतके चढ-उतार अन ईतक्या डोंगररांगा पार करणे? हे शक्य झाले उत्कृष्ट मार्ग नियोजन,गट नियोजन तसेच सहकार्याची भावना यामुळे तसेच डॉ. अडके सर, आमचे अहो आणि टिम मैत्रेयमुळे... !


सर्वांना बरोबरच घेऊन जायचे व जमेल, करु शकता हा विश्वास नवोदितांनाही द्यायचा हे group motivation मुळे शक्य होतेय. गेले ८/९ महिने मी फिटनेसकडे केलेले दुर्लक्ष, मानसिक अस्थिरता यामुळे ट्रेक किंवा निव्वळ चालणे हेही जमणार नाही म्हणुन गमावलेला आत्मविश्वास खरंतर या कालच्या ट्रेकमुळे परत मिळाला मला तसेच night trek चा अतिशय रोमांचक आणि सुंदर अनुभव असो या ट्रेक मधिल सर्वांचे अभिनंदन.. तसेच मला प्रेरणा दिल्याबद्दल डॉ. अडके सरांसहित सर्व सहकारीवर्गाचे खुप खुप आभार...

Scroll to Top