{{brizy_dc_image_alt imageSrc=

सभासद व्हा

गडकोट भटकंतीच्या चळवळीत सामील व्हा !!!

मैत्रेय प्रतिष्ठानच्या मोहिमांची

फोटो गॅलरी - Year 2025

गॅलरी पाहण्यासाठी कृपया खालील फोटोवर क्लिक करा
{{brizy_dc_image_alt imageSrc=

गिरीमाथा अरण्य मोहीम : किलचा वसंतयात्रा : एप्रिल 2025

{{brizy_dc_image_alt imageSrc=

साहसी दुर्गमोहीम : जुना माळशेज घाट - मोरोशीचा भैरवगड : मार्च 2025

{{brizy_dc_image_alt imageSrc=

श्री पन्हाळगड परिक्रमा :

28 डिसेंबर 2025

गिरीमाथा अरण्य मोहीम : किलचा वसंतयात्रा : 6 एप्रिल 2025

फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा

किलचा पठार- मालपवाडी सडा : एक अद्भुत निसर्ग शिल्प.


तसं किलचाला अनेक वेळेला जाणं झालं होतं,,, पावसाळ्यानंतर जेंव्हा पठार फुलतं तेव्हा,,, ऐन उन्हाळ्यात गांडुळ मातीत हरवतं तेव्हा,, आणि ऐन पावसाळ्यात धुकं आणि पाण्याच्या सीमा रेषा ओलांडत तेव्हा,, असा ऋतुगणिक किलचावर गेलो... या किलच्या वर उभं राहीलं की वेडावून जायला होतं धुंदवडे शेळोशीच्या पठार माथ्यापासून ते दाजीपूरच्या सड्यापर्यंत राधानगरी- गगनबावड्याचा एकमेकात मिसळलेला अरण्य प्रदेश नजरेत मावत नाही,, खरतर अरण्याला हद्द नसते आणि आपण ठरवली तरी ते ऐकत नाही....


किलचा वर उभं राहीलं की भोवतीची अरण्ये आणि त्यातून डोकावणारे पठारांचे हे डोंगरमाथे खुणवायचे,, पण एक सडा मनातून हलायचा नाही,, सारखा खुणवायचा

मालपवाडीच्या माथ्यावरचा अफाट सडा. तो किलच्या वरून खुणवायचा धामणी खोऱ्यातनं अंगावर यायचा,, हवालदार वाडी,, धनगरवाडीतनं वाटा सुचवायचा धामोड,, केळीशी (बुद्रुक) जाधववाडी, कुरणेवाडीतन जातांना बोलवायचा... असा नितांत रमणीय सडा म्हणजे सह्याद्रिच्या सौंदर्याच आडवाटेवर दडलेलं अलौकीक रुपच,,,

धामोडकडून तुळशी जलाशय डाव्या हाताला ठेवत केळीशी बुद्रुक ओलांडून हणबरवाडी या थेट किलच्याला भिडलेल्या डोंगरवाडीत पोचायच आणि वाडी ओलांडून थेट किलच्याच्या जंगलात शिरायचं. जंगल चढाच्या सुरूवातीलाच बारमाही पाण्याचा झरा लागतो,, आजही वाडी याच पाण्याच्या झऱ्यावर जगते!! मग भर जंगलातली डोंगर चढाई... पळस, पांगिरा, कुंभा, अंजन, हिरडा, बेहडा नाना, आंबा, जांभळं, गेळा, करवंद, , अळू,रानलिंबू, अर्थात नाटक नार, अन्तहीन पसरलेली गारंबी , माकडीचे झाड, भेर्ली माड, रान आवळा, वेताची बेटं,नरक्या या आणि असंख्य वनसपतींनी समृद्ध अशा घनदाट अरण्याची डोंगर आणि मग शेवटच्या छोटेखानी प्रस्तरारोहणाने किलचा पठारावर आगमन! या प्रस्तर चढाईच्या अलीकडची आरपार गुहा आणि तेथून उत्तरेकडे दिसणारा गगनबावड्याचा अरण्य डोंगर प्रदेश केवळ अद्भुत!!


या किलच्यावरून नैऋत्येला दिसणारा मालपवाडीचा कित्येक वेळा हुलकावणी देऊन गेला होता पण या वेळी निश्चय केला मालपवाडीचा सडा गाठायचाच,,,,

केळोशी बुद्रुकच्या वाटेवर डावीकडे मालपवाडीला जाणारा फाटा, तिथून चार पांच किलोमीटर वाडी, रस्ता वाडीतच संपतो पुढे केवळ डोंगर आणि अरण्यच,,

या वाटेवर मालपवाडीच्या अलिकडे डाव्या बाजूच्या कच्च्या सडकेने दोन किमी अंतर गेल्यावर गर्द राईत ज्योतिबाचं ठाणं आहे. बेहडा, भेर्लीमाड, कऱ्या, फणस, आंबा जांभूळ आदी वृक्षांच्या छायेत हा ज्योतिबा बसलाय,,, वैशिष्ठ्य म्हणजे इथे ज्योतिबाची मूर्ती नाही! स्वयंभू दगडी तांदळा हेच ज्योतिबाचे रूप,, गर्भ गृहाबाहेर नंदी हे आणखी एक वेगळेपण!!!


आज या ज्योतिबाला दंडवत घातला किलचा करून टळटळीत ऊन्हातच. बावेलीची जुनी जंगलवाट सोडून घनदाट अरण्य वाटेने सड्याची वाट चढू लागलो. ऊन्हाळ्यातली भर दुपार असूनही अरण्यातली चालं वृक्षवल्रीनी सुसह्य केली होती. हिरडा बेहडा जांभूळ कुंभ्याच्या जोडीला गारंबीही मिळेल तशी पसरलेली दिसत होती. कारवीचा उग्र गंध, रान आंब्याच्या पालवीचा मोहोरा सारखा गंध, रानजाईचा शीतल गंध आणिक किती तरी अपरिचित गंधानी तयार झालेला रानगंध छाती भरून घेत मालप वाडीचा सडा अरण्याच्या पोटातून चढत होतो किंबहुना अरण्य गर्भातलीच चाल.....

भरदुपार चा टळटळीत सूर्य नारायण डोक्यावर घेतच मालप वाडीच्या सड्यावर पाऊल ठेवलं आणि अक्षरशः स्तिमित झालो,,, काळ्या अग्निजन्य खडकांचे नजरेत न मावणारे ते पठार... पोटात असंख्य जीव सांभाळत किमान वळीव पावसाची वाट बघणारी पठारावच्या असंख्य, उथळ ओबड खड्डयां मधली माती, रान लिंबूच ' एकाकी झाड, पठारावरून दिसणारे तुळशी, धामणी जलाशय... डोंगर कपाऱ्यात वसलेल्या वाड्या वस्त्या हे सार निसर्ग शिल्प म्हणजे मालपवाडीचा सडा!!!


काही दिवसांनी पठारावर वळवाचे वारे थैमान घालतील पोटात असंख्य जीव जपून ठेवणाऱ्या जणू गर्भवती मातीवर त्याच वळवाच्या आकाशधारा बरसतील, मृदगंध आसमंत भर पसरेल इवले इवले जीव माती च्या पोटातून जन्म घेतील, आकाशाकडे पहात रंगीबेरंगी फुला पानांनी नटतील,,, आपल्या बरोबर सडाही रंगीबेरंगी करतील आणि जीवनाचा हा आनंद सोहळा संपवून पुन्हा नव्याने जन्मण्या साठी सड्याच्या पोटात लुप्त होतील...


भर उन्हात सड्याच्या पोटातल्या त्या नवोन्मेषी सृष्टीला नव्या जीवनाच्या शुभेच्छा देऊन आम्ही पुन्हा मालपवाडी च्या अरण्य गर्भात शिरलो.... नवनिर्मितीचा नवा संदेश घेऊन...


डॉ. अमर अडके,

मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर

साहसी दुर्गमोहीम : जुना माळशेज घाट - मोरोशीचा भैरवगड : 09-10 मार्च 2025

फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा

रविवार दि. 9 मार्च, सोमवार दि. 10 मार्च 2025

प्रस्थान दि. 8 मार्च. शनिवारी रात्री

आव्हानात्मक माळशेज डोंगररांग दुर्गमोहीम : निवासी दुर्गमोहीम

काठीण्य - अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण चढाई


ठाणे (पूर्व) - पुणे (उत्तर) - अहिल्या नगर (पाश्चिम) या सीमावर्तीप्रदेशातल्या अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक डोंगररांगांमध्ये अफाट कड्यांच्या, गगनाच्या पोटात शिरणाऱ्या अजस्त्र कातळ भिंतींच्या, साहसाला आव्हान देणाऱ्या सह्याद्रिच्या रौद्र सौंदर्याची थरारक अनुभूती देणाऱ्या,,, बितनगडापासून हरीचंद्रगडापर्यंत, सिंदोळ्यापासून कुंजरगडापर्यंत, दुर्गढाकोबा पासून कलाडगडापर्यत, सादडे (साधले?) घाटापासून करवली घाटापर्यंत, रतनगड - खुट्टया पासून सांदण दरीपर्यंत, आजोबा - कात्राबाई पासून घनचक्करपर्यंत बेलाग कडे, अजस्त्र भिंती यांच्या अंतरंगात, अंगाखांद्यावर साहस एकवटून फिरत राहीलो... त्यालाही आता चार दशके उलटून गेली,,, याच दुर्गम सह्याद्रिमंडलात त्याच्या रौद्र सुंदरतेने आणि चढाईच्या कठीणतेने साहसी दुर्गारोहणाचे आव्हान बनलेला "मोरोशीचा भैरवगड" नेहमी साद घालतो.....

मोरोशीच्या भैरवगडाचा माथा... केवळ शरीरच नव्हे तर मनही वाऱ्यावर.... स्वार करणारा.... तो आकाशात घुसलेला डोंगरमाथा.... जणू गगनाच्या गाभाऱ्यात विराजमान... त्या भारलेल्या गगनाला स्पर्श करणाऱ्या शिखरावरच्या माझ्या मैत्रेयांच्या डोळ्यातले आनंदाश्रू आणि आकाश भरले भाव......

बस आयुष्यात मला आणखी काय हवं आहे ?


अशीच उंच शिखरे गाठत रहा...

जेवढी तुम्ही उंची गाठाल...

तेवढा मी उंच होईन...

तुमच्या पावलांना...

तुमच्या ध्यासाला...

तुमच्या धाडसाला...

तुमच्या उंच यशाला...

तुमच्या माझ्यावरच्या विश्वासाला...

पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार....


डॉ. अमर अडके


मोरोशीच्या भैरवगडाच्या आकाशभेदी माथ्यावर पोचलेल्या सर्व मैत्रेयांचे मनःपूर्वक अभिनंदन.....

श्री पन्हाळगड परिक्रमा : 28 डिसेंबर 2025

फोटो पाहण्यासाठी कृपया फोटोवर क्लिक करा

श्री पन्हाळगड परिक्रमा


दुर्गाचे अंतरंग सुरक्षित रहातात ते कणखर बाह्यरंगामुळे, तटबंदी आतील बालेकिल्ल्यासहित अवघा दुर्ग लढतो इतिहास निर्माण करतो तो या अभेद्य बाह्यकवचा मुळेच !!!


दुर्गाचे बाह्यरंग जितके दुर्गम तितका दुर्ग अधिक बलवंत,, याची प्रचितीच जणू आजच्या श्री पन्हाळगड परिक्रमेत प्रत्येकाला आली,,, म्हणूनच दुर्ग खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर त्याच्या अंतरंगा बरोबरच कणखर आणि राकट बाह्यरंगही अनुभवले पाहिजेत...


आजची दुर्ग परिक्रमा याच हेतूने होती. या दुर्गम दुर्ग परिक्रमेत सहभागी होणाऱ्या आणि पन्हाळगडाच्या पुण्यभूमीच्या प्रदक्षिणा मार्गावर मनोभावे पाऊले टाकणाऱ्या प्रत्येकाचेच करावे तेवढे कौतुक थोडे आहे,, युगकर्ते श्री शिवाजी महाराज आणि पावन स्वराज्याप्रती आपली कृतज्ञताच जमेल तेवढी आपण अर्पण केली एवढेच विनम्रपणे आपण म्हणू शकतो....


ही दुर्गम प्रदक्षिणा केवळ आणि केवळ टीम मैत्रेयचे संघनायक यांचेसंयोजन आणि अथक कष्टांमुळे पूर्ण होऊ शकली याचा मला सार्थ अभिमान आहे. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आभार....!


डॉ. अमर अडके...


तयार रहा एका नव्या वेगळ्या मोहीमेला.... आपल्याला लवकरच सादर...

Scroll to Top