जागर इतिहासाचा
दृकश्राव्य माध्यमातून (Slideshow) गडकोट
गॅलरी पाहण्यासाठी कृपया खालील फोटोवर क्लिक करा
शिव छत्रपतींनी ज्या गडकोटांवरून हे स्वराज्य निर्माण केले़ हे गडकोट म्हणजे धारातीर्थे आहेत, स्फुर्तीस्थळे आहेत‚ शिवरायांचे हे गडकोट वेगळया माध्यमातून लोकांना दाखवावेत, त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी या ध्येयपूर्ण हेतूने हे गडकोट, त्यांची रचना, स्थाऩ, स्थापत्याची वैशिष्ठये, रोमांचकारी इतिहास, स्वराज्य स्थापनेच्या संघर्षात आखलेल्या पराक्रमी मोहीमा या सर्वांचा समावेश करून स्फूर्तीदायी‚ माहीतीपूर्ण, प्रबोधनपर कार्यक्रम, ध्वनीचित्र स्लाईड-शोच्या माध्यमातून तयार केले. असे कार्यक्रम् महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अनेक ठिकाणी अमाप प्रतिसादात सादर केले. आजपर्यंत कोल्हापूऱ, इचलकरंजी, निपाणी, रोहा, अहमदनगऱ, राहूरी, जळगाव, विजयदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, पुणे, बेळगाव, खानापूऱ, पन्हाळा, सातारा, सांगली आदि अनेक ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत़ मान्यवर संस्थांच्यावतीने सादर केले आहेत.
जागर इतिहासाचा
“गडकोट माझे सांगाती” छायाचित्र प्रदर्शन
गॅलरी पाहण्यासाठी कृपया खालील फोटोवर क्लिक करा
गेली ३६ वर्षे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील गडकोटांची भटकंती सुरू आहे. ‘चारशेचोपन्न’ किल्ले आजपर्यंत पायी फिरून अभ्यासले आहेत. हे किल्ले़ त्यांची रचना़वैशिष्ठये़ इतिहास़ आसमंत यांसह छायाचित्रित केले आहेत. अशी दुर्मिळ तेराहजार छायाचित्रे आजपर्यंत काढली आहेत. शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झालेले हे हे गडकोट म्हणजे आपली स्फूर्तीस्थळे आहेत. त्यांचे दर्शन आबालवृध्दांना व्हावे़ त्यांच्यात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी या हेतूने यातील निवडक छायाचित्रांचे एक भव्य प्रदर्शन तयार केले. हे वैशिष्ठयपूर्ण प्रदर्शन अनेक ठिकाणी सादर केले. सर्वच ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन कोल्हापूऱ, कागल, निपाणी, बेळगांव, सावंतवाडी, इचलकरंजी, गारगोटी, जळगांव, राहुरी, रोहा, पुणे, सातारा, अहमदनगर तसेच विजयदुर्ग महोत्सव, शिवदुर्ग पन्हाळा महोत्सव, कणकवली पर्यटन महोत्सव आदी अनेक ठिकाणी सादर केले आहे. या माहीतीपूर्ण प्रदर्शनास आजपर्यंत राजकीय नेते, मंत्री तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे सातारा, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत युवराज संभाजीराजे आदि शिवरायांच्या राजवंशजांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत तसेच अभिनेता नाना पाटेकऱ, गायक अरूण दाते अशा अनेक मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन कौतुक केले आहे
जागर इतिहासाचा
स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन
गॅलरी पाहण्यासाठी कृपया खालील फोटोवर क्लिक करा
शास्त्रोक्त पध्दतीने दुर्ग संवर्धन हे संस्थेचे ब्रीद आहे. त्यासाठी ‘दुर्ग स्वच्छतेतून दुर्ग संवर्धन’ हा संस्थेचा विशेष उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत आजवर संस्थेने अनेक किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन अभियान राबविलेले आहे. त्यापैकी काही अभियाने महाराष्ट्रातील मोठी आणि पथदर्शी उपक्रम म्हणून नावाजली गेली आहेत. दुर्ग परिसरातील लोकांना दुर्गांचे महत्व पटवून देऊन स्थानिकांद्वारेच दुर्ग संरक्षण आणि संवर्धन हा उपक्रमही संस्थेद्वारे चालविला जातो. तसेच दुर्गांवर येणार्या दुर्गप्रेमींना दुर्ग सर्वंकषपणे समजावा यासाठी स्थानिक वाटाडे व मार्गदर्शक तयार करण्याचा एक वेगळा उपक्रमही संस्था राबविते. अनेक किल्ल्यांवर असे मार्गदर्शक (Guide) आणि वाटाडे संस्थेने तयार केले आहेत.
जागर इतिहासाचा
भूमी पुत्रांशी संवाद
गॅलरी पाहण्यासाठी कृपया खालील फोटोवर क्लिक करा
मैत्रेय स्नेहमेळावा,
"बोलू किल्ले, बोलू अरण्ये
सांगू निसर्ग, सांगू भटकंती
घेऊ अनुभूती, करू संवाद,
फिरस्त्या ध्येयवेडाचा
एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात,
भटक्यांच्या हा मेळावा, परस्पर संवादाचा, परिचयाचा, गप्पांचा, मनोगतांचा, गत मोहीमांच्या अवलोकनाचा आगामी मोहीमांच्या आयोजनाचा, नव्या संकल्पना नव्या निश्चयांचा, मैत्रेयच्या वाटचालीच्या सुवर्णक्षणांचा, काही ध्येयवेड्यांच्या उपस्थितीचा एक आगळावेगळा " भटक्यांचा स्नेहमेळावा".
चाकोरीबाहेरच्या वेगळ्या अनुभूतीसाठी ! भटक्यांच्या गप्पांच्या या कार्यक्रमाचे आपणास सहकुटुंब आमंत्रण !
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. राजेश पाटील, कार्यवाह, मो. 9850424417
सागर आफळे, समन्वयक, मो. 9326009376